Thursday, December 27, 2007

गत- विलम्बित

व्यवस्थेच्या धगीत
पोळलो जात असुनही
अधिक मोठ्या परीघासाठी जगत होतो
मात्र
नकारानन्तर
मनाचा ताब घेउन
तु घटट केलेस पाश cynicism चे
मज़्ह्या भोवती
गोठुन टाकलेस मला, एका चिरेबन्द अवस्थेत.

तुज़्ह्य मुख़वट्या आड्चा चेहरा
झालाय अधिकच धुसर
काळजाला झोम्बणारे दुक्ख मागे ठेउन

नकाराचे भोन्गळ समर्थन करायला
उभरलेस निरार्थक शब्दान्चे तोलेजन्ग मनोरे,
नाकार्लेस मला, माझ्या अस्तित्वासह.

वेदनेच्या खुणा
पुसण्याचे प्रयत्न केले तरीही
जग्ण्याच्या भेदक वास्त्वापलिकडे
विश्वच करुन टाकलेस सन्कुचित
लाउन सुरुन्ग माझ्या आत्मभानाला

- Dhaval Kulkarni,
Mumbai, November 17, 2007

0 Comments:

Post a Comment

<< Home